♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणारमध्ये अग्नीतांडव… ग्रामीण रुग्णालयाला आग; वृध्द रुग्णाचा होरपळून मृत्यू

MH 28 News Live / लोणार ( राहुल सरदार ) : शहारातील बसस्थानकात २२ डिसेंबर २०२४ रोजी अनोळखी व्यक्ती झोपलेल्या स्थिती मध्ये दिसून आला असता लोणार बसस्थानक वाहतूक नियंत्रक संजय राठोड यांनी १०८ वर फोन करून सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. लोणार ग्रामीण रूग्णालयात सदर व्यक्तीला भरती करण्यात आले. त्यांची प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यांनतर सदर व्यक्तीला बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचे डॉक्टरानी सांगितले. मात्र सदर व्यक्तीसोबत घरचे नातेवाईक नसल्याने त्यांना एकटे पाठवणे जमत नसल्याने डॉ. फिरोज शहा यांनी या बाबतची माहिती लोणार पोलिसांना दिली. सदर व्यक्तीला लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. सदर व्यक्ती हे बिडी ओढत असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील कर्मचारी यांनी त्यांना बिडी ओढू नकोस सांगितले होते अशी माहिती डॉ. फिरोज शहा यांनी सांगितली.

module: a;
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Night;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 46.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~25: 0.0;

रात्रीच्या वेळेस कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांना २३ डिसेंबर २०२४ च्या पहाटे ३ वाजून २० मिनिटे वाजे दरम्यान रुग्णाच्या वार्डातून धूर निघत असल्याचे दिसून आले. सदर कर्त्यव्यावर असलेल्या वाटसर यांनी तात्काळ रुग्णालयातील संबधितांना याबाबत कळविले व ब्रदर विष्णू खरात यांनी वार्डातील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्र्तीच्या बेडला आग लागून सदर व्यक्ती जळत असल्याचे त्यांना दिसून आले. आग विझवण्यापर्यंत सदर व्यक्ती जळून मृत्यू पावले होते. सदर आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, तहसिलदार भूषण पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंत्यविधी करण्यात आला.

सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी यावेळी ग्रामीण रूग्णालयात पाहणी केली. यावेळी तहसिलदार भूषण पाटील, पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे, नायब तहसिलदार रामप्रसाद डोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले हे उपस्थित होते. सदर घटनेबाबत लोणार पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, नितिन खरडे करीत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या मर्गावरून सदर व्यक्तीचे नाव हरिभाऊ बापुजी रोकडे अंदाजे वय ६५ वर्ष राहणार पैठण असल्याची माहिती मिळाली आहे.

आगीच्या कारणाविषयी संभ्रम

सदर आगीची घटना सदर व्यक्तीने बिडी ओढल्या कारणाने घडली की शॉट सर्किटने घडली याबाबत फायर ऑडीट झाल्यास सत्य बाहेर येऊ शकते. कर्तव्यावर असलेले ब्रदर विष्णू खरात यांनी सैनिक प्रशिक्षणाचा अनुभव पणाला लावत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ६ आग विझवण्याचे सिलेंडर वापरून आग आटोक्यात आणत आगेवर नियंत्रण मिळवले. अन्यथा आग रुग्णालयात सगळीकडे पसरून आणखी मोठा अनर्थ घडला असता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129