
भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त चिखलीत पडला आगळावेगळा पायंडा; बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकाला मिळाली अध्यक्षपदाची संधी. विनोदबापू देशमुख यांची विश्वकर्मा जयंती व उद्योग दिवस समितीच्या अध्यक्षपदी निवड
MH 28 News Live / चिखली : निर्मिती क्षेत्रांतील प्रत्येक कारागीर म्हणजेच विश्वकर्मा या व्यापक. संकल्पनेतून साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंती व उद्योग दिनाच्या आयोजनानिमित्त यंदा एक आगळावेगळा पायंडा पाडण्यात आला. भगवान विश्वकर्मा जयंतीचा उत्सव जाती – धर्मांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कारागिराने साजरा करावा या कामगार नेते सतीश शिंदे यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीच्या उत्सवा समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच बांधकाम व्यवसायातीशी संबंधित व्यक्तीची निवड करण्यात आली. समिती अध्यक्षपदी येथील प्रतिथयश बांधकाम कंत्राटदार विनोदबापू देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. दि. २ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयोजन समितीच्या बैठकीत देशमुख यांच्या नावावर सर्वांनुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील जाती धर्माच्या बंधनापलीकडे जाऊन विविध क्षेत्रातील कारागीर व बांधकाम क्षेत्र, प्लंबर, फर्निचर, कारागिर, पीओपी कारागिर, इलेक्ट्रिशियन, टाइल्स, कारागीर वेल्डिंग कारागिर,पेंटर, इंजिनियर यांच्या सहभागाने विश्वकर्मा जयंती साजरी करावी अशी सर्वसमावेशक व अभिनव संकल्पना कामगार नेते सतीश शिंदे यांनी मांडली होती. या व्यापक आयोजनातून सामाजिक एकतेचा संदेश समाजात पोहचवा अशी भूमिका सतीश शिंदे यांची यामागे आहे. या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यावर्षी सुद्धा व भगवान विश्वकर्मा जयंती व उद्योग दिन मोठ्या उत्साहाने व भव्य प्रमाणात साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला. या वर्षीच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी चिखली तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी बांधकाम कंत्राटदार विनोद देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीसाठी संकल्पक तथा मार्गदर्शक कामगार नेते सतीश शिंदे, अनंत राऊत, विजय कुटे, अशोकबापू देशमुख, वसंता खराटे, राम जपे, अमोल निकाळजे, पवन परिहार, चंदन गवई, मिर्झा पाऊक, भागवत जाधव, कैलास देशमुख व इतर कारागिर बांधव हजर होते. देशमुख यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चिखली तालुक्यातील बांधकाम व्यवसायासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लहान मोठ्या कारागीर बांधवांनी एकदिलाने व उत्साहाने भगवान विश्वकर्मा जयंती व उद्योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष विनोद देशमुख यांनी केले आहे