♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अडीच हजार विद्यार्थ्यांनी काढले ३५ हजार सूर्यनमस्कार: चिखलीच्या आदर्श विद्यालयात रथसप्तमी निमित्त झाला जागतिक सूर्यनमस्कार महायज्ञ

MH 28 News Live / चिखली : रथसप्तमीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना योग व्यायाम याची आवड निर्माण व्हावी या हेतूने स्थानिक आदर्श विद्मध्यामध्ये सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यालयातील २६४५ विद्यार्थी आणि ६२ शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्येकी १३ सूर्यनमस्कार काढले असे एकूण ३५१९१ सूर्यनमस्कार काढण्यात आले.

सूर्यनमस्काराचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करताना विद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर कुटे यांनी सूर्यनमस्कार योग साधनेमध्ये महत्वपूर्ण अशी योगसाधना आहे. महत्वपूर्ण अशा योग साधनेमुळे जगातील भरपूर प्रमाणात लोक सूर्यनमस्कार ही साधना आकारतात. सूर्यनमस्कारामुळे आपल्या आरोग्य अधिक सुधारते आणि सुदृढ बनते. सूर्यनमस्कार केल्याने पूर्ण अंगाचा सर्वांग योगासन व्यायाम होतो आणि त्याचबरोबर मानसिक,शारीरिक आणि आत्मिक आरोग्य सुदृढ होते. सूर्यनमस्कार ही योगसाधना जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय आहे. सूर्यनमस्काराचे बहुगुणी फायदे आपल्या शरीराला होतात. असे सांगितले सदर सूर्यनमस्कार महायज्ञाला विद्यालयातील पर्यवेक्षक श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे सर्व विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129