
महत्त्वाची बातमी – दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज; अकरावीच्या प्रवेशाची गैरसोय टाळण्यासाठी बोर्डाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय…
MH 28 News Live : दहावीच्या निकालाची तारीख १३ मे रोजी दुपारी एक वाजता लागणार असल्याचे सांगितले जात असून त्यानुसार आता केवळ चार दिवस निकाल आला बाकी आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हा निर्णय अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत बदल
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ करत असतात. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडेल असे जाहीर केले आहे. याबाबत बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
ऑनलाइन प्रवेश आणि बोर्डाचे आवाहन
महाराष्ट्र बोर्डाने स्पष्ट केले आहे की, अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइनच होणार आहे. यासंदर्भात बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत वेबसाइट्सवरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊ नये, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
या संकेतस्थळावरून करा नोंदणी
प्रसिद्धीपत्रकात बोर्डाने पुढे नमूद केले आहे की, “पालक आणि विद्यार्थ्यांनी अनधिकृत संकेतस्थळांवरून येणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊन प्रवेश प्रक्रिया करू नये. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध होणारी माहिती हिच अधिकृत आणि विश्वासार्ह आहे.” अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in आहे, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
सुलभ आणि पारदर्शक प्रवेशाची प्रक्रिया
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय खूपच दिलासादायक आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. त्याचबरोबर अनधिकृत संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन बोर्डाने केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल.