
घराला रंग देण्यावरुन उसळले दोन चुलत भावांमध्ये भांडण. रंग दिलेल्या भिंतीवर फेकले अँसिड आणि झाली मारहाण
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील भालगाव येथे आपल्या मुलाच्या लग्नाची तयारीसाठी म्हणून घराला रंग दिल्याच्या कारणामुळे दोन चुलत भावांच्या कुटुंबांमध्ये वाद होऊन या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीदरम्यान रंग दिलेल्या भिंतीवर आरोपीने ऍसिड फेकले; त्यामुळे वाद आणखी चिघळला आणि चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली.
येथून जवळच असलेल्या भालगाव येथील दामोदर कुंडलीक काकडे (६२ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकरणात त्यांचा मुलगा तुषार याच्या लग्नाची तयारी म्हणून घराला रंग देणे सुरू होते. काल सकाळी चुलतभाऊ मधुकर काकडे याने त्यांच्या रंग दिलेल्या भिंतीवर ॲसिड टाकले. त्यामुळे भिंतीवरील रंग खराब झाला. तुषारने ” अँसिड का फेकले ? ” असे विचारले असता मधुकर काकडेने त्याच्या उजव्या हातावर काडी मारली व भांडण सोडविण्यास गेलेल्या दामोदर काकडे यांनासुध्दा विट मारून जखमी केले. काडीने बरगडी, डाव्या हातावर मारहाण केली. शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यदीचा चुलतभाऊ मधुकर कचरू काकडे यांच्यासोबत त्यांचा २०१६ पासून शेतीचा वाद सुरू आहे. त्यामुळे हा वाद आणि हाणामारी झाल्याचे फिर्यदीचे म्हणणे असून चिखली पोलीस या बद्दल अधिक तपास करत आहेत.



