♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सरपंच संघटनेच्या चिखली तालुका अध्यक्षपदी रवींद्र डाळीमकर

MH 28 News Live / चिखली:- तालुक्यातील मौजे कव्हळा सावरखेड नजीक गट ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच रवींद्र नारायणराव डाळीमकर यांची चिखली तालुका सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाली. सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे व विदर्भ अध्यक्ष देवा पाचभाई यांच्या आदेशान्वये बुलडाणा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम काळे यांनी एका नियुक्ती पत्रा द्वारे केली आहे.

नेहमी समाजकरणाच्या माध्यमातून चर्चेत असलेले लोकनियुक्त सरपंच रविंद्र डाळीमकर यांनी कव्हळा गावाचा दोन वर्षात चेहरा मोहरा बदलला. जी गावातील कामे ३० वर्षात झाली नाही ती त्यांनी अवघ्या दोन वर्षात करून दाखवली, त्यांच्या कर्तृत्वाची पावती म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने त्यांना चिखली तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या पदाच्या माध्यमातून गाव पातळीवरील समस्या तसेच सरपंच मंडळीच्या अडीअडचणी सोडवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे, जनसेवेचा वसा घेऊन लोकांसाठी काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशा जनसामान्यात प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129