♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एकाच क्षणात संपलं कुटुंब भीषण तिहेरी अपघातात पती, पत्नी व मुलाचा मृत्यू; घाटनांद्रा गावावर शोककळा

MH 28 News Live / चिखली : चिखली ते मेहकर रस्त्यावरील खैरव फाट्यावर मंगळवारी (दि. ४ जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहू ट्रक, डस्टर कार (MH 04 GE 5508) आणि मोटारसायकल यांच्यातील भीषण धडकेत मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावातील गणेश यादव गायकवाड (वय ४५), त्यांची पत्नी लक्ष्मी गायकवाड (वय ४०) आणि मुलगा कृष्णा गायकवाड (वय १५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात तिघांचे मृतदेह पडले होते. गंभीर जखमी अवस्थेत असलेले गणेश गायकवाड यांना चिखलीतील रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघातात इतर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, वाहनांचा अतिवेग, चुकीचे ओव्हरटेक किंवा चालकांची निष्काळजीपणा यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. या दुर्देवी घटनेमुळे घाटनांद्रा गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी गायकवाड कुटुंबाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129