♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एका अपघाताने संपवलं एक जीवन, भंगवलं एक स्वप्न… शुभमच्या जाण्याने सुटाळा बु. गाव शोकमग्न

MH 28 News Live / खामगाव : सुटाळा बु. गावातील तरुण शुभम दुतोंडे याच्या अपघाती निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एमपीएससी परीक्षा देण्यासाठी दुचाकीने अकोल्याकडे निघालेल्या शुभमचं आयुष्य जयपूर लांडे फाट्याजवळील उड्डाणपुलावर एका दुचाकीच्या भीषण धडकेत थांबून गेलं.

आजकाल अनेक तरुण MPSC, UPSC सारख्या परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांना मोठ्या पदांवर काम करायची इच्छा आहे. लहान गावातील मुलेसुद्धा यासाठी खूप मेहनत घेत आहेत. शुभम दुतोंडे हा सुद्धा त्यापैकीच एक होता. त्याला अधिकारी व्हायचे होते. शुभम रामेश्वर दुतोंडे हा सुटाळा बुद्रुक येथील रहिवासी होता. त्याचे वडील रामेश्वर दुतोंडे हे प्रतिष्ठित नागरिक आहेत. शुभमचा मोठा भाऊ पवन दुतोंडे वकील आहे. १ जून रोजी शुभम MPSC परीक्षेसाठी दुचाकीवरून अकोला येथे निघाला होता.

जयपुर लांडे फाट्याजवळ उड्डाणपुलावर त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडकली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली. परंतु, उपचारादरम्यान ४ जून रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

शुभमने आयुष्यात मोठं काही करून दाखवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एमपीएससी परीक्षा पास होऊन उच्च पदावर जाऊन आपल्या कुटुंबाचं आणि गावाचं नाव उज्वल करायचं होतं. परंतु नियतीच्या क्रूर फेऱ्याने त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं.

त्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग व संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गावाचा एक उज्वल तारा मावळला… आणि स्वप्नांची वाटचाल अचानक थांबली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129