♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धडकेने हिरावले आयुष्य : सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

MH 28 News Live / खामगाव : शहरातील शेगाव रोडवर रविवारी एका दुर्दैवी अपघातात सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी वसंतराव काळे (वय ६८, रा. एसटी आगारासमोर, खामगाव) यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या धडकेने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर वाहनचालकाने पलायन केल्याची माहिती असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

याप्रकरणी गणेश रमेश सरोदे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाहनचालक अमोल दशरथ तायडे (रा. मडाखेडे बु., ता. जळगाव जामोद) याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम २८१ (अविचाराने वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणे) आणि ३०४(अ) (दुर्घटनेत निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून अपघातामुळे काळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिकांनी यावेळी केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129