♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगाव हादरलं; विवाहितेची आत्महत्या…. सासरच्यांवर छळाचा आरोप

MH 28 News Live / शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर बुधवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी अक्षरशः शोकमग्न झाले. फक्त ३० वर्षांची दिपाली विशाल बेलोकार या विवाहितेने साडीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. दिपालीच्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात खळबळ उडाली असून तिच्या माहेरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सासरकडून छळाचे गंभीर आरोप

दिपालीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत धक्कादायक आरोप केले आहेत. पतीकडून सतत होणारी मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ या अत्याचारांना कंटाळून दिपालीने हे पाऊल उचलल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतकंच नव्हे, तर मोठे दीर संदीप सुपडा बेलोकार, प्रदीप सुपडा बेलोकार, जावा गंगा संदीप बेलोकार आणि जया प्रदीप बेलोकार यांच्याही वर्तणुकीमुळे दिपालीचे आयुष्य असह्य झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी पतीवर भारतीय दंड संहिता कलम १०८ व ३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून इतर आरोपींचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सत्य समोर आल्यावरच या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, दिपालीच्या अकाली मृत्यूने तिच्या माहेरच्यांचे जगच कोलमडले आहे. आईच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नसून, ‘आमच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा’ अशी हाक तिच्या कुटुंबीयांकडून दिली जात आहे. शेगावातील ही घटना पुन्हा एकदा महिलांवरील छळाच्या प्रश्नावर गंभीर चिंतनाला भाग पाडते आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129