
चिखली पोलिसांची मोठी कारवाई : एक बुलडाणा जिल्हा कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध तर दोघे ३ महिन्यांसाठी तडीपार
MH 28 News Live / चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे,ठाणेदार चिखली यांनी स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे वय २५ वर्ष याचा MPDA प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांना सादर केला होता. सदर प्रस्तावावरून जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार आज दि. १८ जुलै रोजी स्वप्नील काकफळे यास एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृह, येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर इसमाविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणे, गांजा सेवन करून सार्वजनिक शांतता भंग करणे, जुगार खेळविणे, गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याशिवाय साहिल राजेंद्र शिंगणे व अनिकेत शाम श्रीमंत या दोघांविरुद्धही महा. पोलीस कायदा कलम 56 नुसार प्रस्ताव तयार करून सादर केला असता त्यांना तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई मा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर,राहुल पायघन तसेच संजय भुजबळ स्था.गु.शा बुलडाणा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.चिखली पोलिसांनी भविष्यातही सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.



