♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जल संजीवनी प्रकल्पाला पुन्हा गती; राहुल बोंद्रे यांच्या पुढाकारातून जलतारा प्रबोधन शिबिर जलतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ करणार खोर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

MH 28 News Live / चिखली : पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. बदलते हवामान, पावसाचे अनियमित प्रमाण, भूजलपातळीत होणारी घट आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण ही काळाची गरज बनली आहे. याच जाणिवेतून लोकनेते तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या पुढाकारातून अनुराधा अर्बन बँक, चिखली यांच्या वतीने शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खोर येथे सायंकाळी ५.३० वाजता जलसंधारण प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला जलतारा जनक तथा राज्य सदस्य जलतारा प्रकल्प महाराष्ट्र शासन डॉ. पुरुषोत्तमजी वायाळ प्रमुख मार्गदर्शक असणार आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात लोकनेते तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यापूर्वी भगीरथ जल संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी केली होती. या उपक्रमांतर्गत विविध नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच बंधाऱ्यांची उभारणी करून पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जलसंधारणाच्या कामातून भूजलपातळी वाढविणे, शेतीला पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय शोधणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा दृष्टिकोन होता.

याच विचाराला पुढे नेत राहुल बोंद्रे यांच्या पुढाकारातून आता जलसंधारणविषयक जनजागृती आणि प्रबोधनाचे कार्यक्रम पुन्हा नव्याने हाती घेण्यात येत आहेत. केवळ पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पावसाचे पाणी उपलब्ध असतानाच त्याचे नियोजन, संवर्धन आणि पुनर्भरण करण्याची मानसिकता समाजात निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मिळणार शाश्वत दिशा

शिबिरात जलतारा जनक तथा राज्य सदस्य डॉ. पुरुषोत्तमजी वायाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे नियोजन, पावसाचे पाणी अडविण्याच्या प्रभावी पद्धती, भूजल पुनर्भरण, जलसंधारणाची शास्त्रीय तंत्रे आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन अनुराधा बँक चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129