
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसाची लोणार भाजपाकडून होळी
MH 28 News Live, लोणार : विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायबर सेलची नोटीस प्राप्त झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या नोटिसांची होळी करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दि. १३ मार्च रोजी जन आक्रोश आंदोलन केले.
शहराध्यक्ष गजानन मापारी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी ११ वाजता बस स्टॅन्ड चौक येथे सर्वांनी एकत्र आले. जमलेल्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवात आंदोलन केले.
यावेळी जिल्हा नेते विजय मापारी, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, कचरू डोळे, भगवानराव सानप, जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव सुरुसे, किसान मोर्चा जिल्हा सचिव उद्धव आटोळे, युवा मोर्चाचे शुभम बनमेरू, युवा तालुकाध्यक्ष दीपक चौधरी, महिला तालुकाध्यक्ष शीलाताई खाडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष आशाताई गांजरे, शेख जावेद, गणेश गाडेकर, प्रकाश नागरे, गणेश तांगडे, गजानन डव्हळे, राम मापारी, संजय बुरुकुल, शंकर खोसरे, अजीम चौधरी, कृष्णा राठोड, किसन गुंजकर, पंढरी मापारी, रवी डोळे, गजानन वाघ, सतीश मुलंगे, परमेश्वर मापारी, गणेश डोळे, गणेश काकड, दत्ता देसाई, सुरेश अंभोरे, बद्री कांगणे, देविदास चाटे, दत्ता कोठे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.