♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्रीराम नवमी महोत्सव खामगावात उत्साहात साजरी होणार. श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरामध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम

MH 28 News Live, खामगाव : कोरोनाच्या सावटा नंतर यावर्षी श्रीराम नवमी महोत्सव श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरा मध्ये उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

गेल्या ४४ वर्षांपासून श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरामध्ये श्रीराम नवमी महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. श्री तुकराम बीज पासून भिक्षा फेरीला सुरुवात होऊन श्रीराम नवमी महोत्सवाला सुरुवात होते. या महोत्सवा निमित्ते विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमात दररोज स.७.३० वा. श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री प्रल्हाद कथामृत, सायंकाळी ६.०० सायं उपासना, पंचपदी आदी कार्यक्रम होणार आहेत.

शनिवार दिनांक ०२ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी श्रीरामरायास पंचसुक्त पवमान अभिषेक, गुढी पूजन, कोठी पूजन ध्वज पूजन व अखंड नाम सप्ताहास प्रारंभ व त्याच दिवसापासून ते शनिवार दिनांक ९ एप्रिल २०२२ पर्यंत दररोज दुपारी ३ वाजता श्रीराम विजय ग्रंथ वाचन होणार आहे. शनिवार दिनांक ०२ एप्रिल रोजी रात्रौ ठीक ८ वाजता प्रा.डॉ.श्री.प्रविण आळशी, खामगाव यांची गायन सेवा. रविवार दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठीक ८ वाजता स.भ.श्री.पराग दुबे व संच, खामगाव यांची गायन सेवा. सोमवार दिनांक ०४ एप्रिल ते शनिवार दिनांक ०९ एप्रिल पर्यंत दररोज रात्रौ ठीक ८ वाजता ह.भ.प.श्री. मुकुंदबुवा देवरस, नागपूर यांची सुश्राव्य कीर्तने. गुरुवार दिनांक ०७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वा. पालखी सोहळा आयोजित केला आहे. यासह रविवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प.श्री.मुकुंदबुवा देवरस, नागपूर यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन, सकाळी ११ वा. श्रीराम विजय ग्रंथ वाचन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म गुलाल नैवेद्य व आरती. परवानगी मिळ्यालास भव्य शोभा यात्रा दुपारी ४ वाजता निघेल. सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व धर्मप्रेमी भाविक भक्तांनी या महोत्सवा मध्ये सहभागी होऊन, दर्शनाचा, कार्यक्रम श्रावणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रल्हाद महाराज राम मंदिर महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129