
श्रीराम नवमी निमित्त चिखली मध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जयंती उत्सव श्रीरामनवमी दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केल्या जातो. यावर्षी देखील दि. १० मार्च रोजी रविवारला रामनवमीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आदर्श विद्यालयाजवळील श्रीराम मंदिर ( रामदासी ) येथे श्रीराम जन्माचा गुलाल व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम नवमी निमित्त चिखली शहरातील दीनदयाल नगर परिसरात आदर्श विद्यालय जवळ असलेल्या श्रीराम मंदिर ( रामदासी ) येथे दुपारी ठीक बारा वाजता श्रीराम जन्माचा गुलाल आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी ठीक चार वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य प्रमाणात शोभायात्रा निघणार आहे. शहरातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत जाणाऱ्या या शोभायात्रेचा समारोप सायंकाळी सात वाजता पुन्हा श्रीराम मंदिरात होईल. या श्रीरामनवमीच्या उत्सवास व शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविकांनी तसेच युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व श्रीराम मंदिर ( रामदासी ) यांनी केले आहे.



