
ऐकावे ते नवलच ! जामगांव येथे शेळीने दिला विचित्र चेहरा असलेल्या पिल्लाना जन्म
MH 28 News Live, मेहकर ( रवींद्र सुरूशे ) तालुक्यातील जमगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मेहकर तालुका गट अध्यक्ष स्वप्नील दुधाट यांच्या घरी त्यांचा पाळीव असलेली शेळीने माणसासारखे तोंड,डॊळे व दात असलेले शेळीने दोन पिल्लंना जन्म दिला असून अशी विचित्र पिल्ले पाहून परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
या विचित्र पिल्लांना पाहण्यासाठी जामगावसह आसपासच्या गावातील लोक सुध्दा गर्दी करु लागले आहेत. या घटनांमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या जात असून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.