
मुस्लीम समाजाच्या विविध मागण्यांसाठी उबेद अली खान यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन
MH 28 News Live, बुलढाणा : मुस्लीम समाजाच्या शिक्षण, आरक्षण व संरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत उबेद अली उर्फ भाईजान यांचे नेतृत्वात दि 26 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनानुसार सध्या महाराष्ट्र राज्यात मुस्लीम समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्टया अतिशय मागासलेला आहे शिवाय तो अतिशय भेदरलेल्या अवस्थेत जिवन जगत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले ५ टक्के शैक्षणिक
आरक्षण ताबडतोब लागु करण्यात यावे, नोकऱ्यामध्ये सुध्दा आरक्षण मिळावे, अल्पसंख्याक समाजाची केंद्र व राज्य शासनाने बंद केलेली शिष्यवृत्ती ताबडतोब लागु करण्यात यावी, सारथी व बार्टीच्या प्रमाणे मुस्लीम समाजासाठी सुध्दा निधी उपलब्ध करुन संस्थेची स्थापना करण्यात यावी, स्किल डेव्हलपमेंट मध्ये मुस्लीम समाजास प्राधान्य देण्यात यावे, ऊर्दु प्राथमिक शाळा मध्ये इंग्रजी माध्यमाचे सुध्दा वर्ग सुरु करण्यात यावे., सच्चर समितीचा शिफारशी १००टक्के लागु करण्यात याव्या, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास १०० कोटीचा निधी उपलब्ध करुन दयावा, प्रत्येक जिल्हयाचा ठिकाणी मुस्लीम विदयार्थी व विदयार्थीनीसाठी वसतीगृह सुरु करण्यात यावे, गोहत्या बंदी, माब्लीचिंग, लवजिहादच्या नावा खाली मुस्लीम समाजावर दडपण व अन्यायामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुस्लिम समाजासाठी सुध्दा ॲट्रासिटीच्या धर्तीवर कायदा करण्यात यावा, महाराष्ट्र राज्यात समान संधी आयोगाची स्थापना करुन सर्व समाजासाठी समान संधी उपलब्ध करुन द्यावी अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात नमूद आहे.
यावेळी निवेदन देतांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे जिलहाध्यक्ष उबेद अली खान यांच्यासमवेत दानिश शेख, अल्ताफ खान,तारिक जमादार, शेख सदीक बाबू भाई, प्रा.तनजीम हुसैन,शेख मोबिन,डॉ.शादाब सिद्दीकी,समीर शेख, अजीम शेख आदि उपस्थित होते.



