♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समर्थ भारत केंद्रातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

MH 28 News Live, चिखली : थोर क्रांतिकारक व समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. यानिमित्त समर्थ भारत केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी आदरांजली अर्पण केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिखली तालुका संघचालक अरविंदराव असोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास संघाचे बुलढाणा तालुका संघचालक बावसकर सर, चिखली नगर संघचालक शरद भाला, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, आरपीआयचे विदर्भ अध्यक्ष संजय वाकोडे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशराव सराफ, बालाजी अर्बनचे अध्यक्ष अँड. मंगेश व्यवहारे, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, सहकार भारतीचे सुदर्शन भालेराव, प्राचार्य डॉ. किशोर वळसे, हिंदूराष्ट्र् सेनेचे जिल्हा सहसंघटक दीपक गुळवे, जिल्हा कोषाध्यक्ष राकेश चोपडा, शहर प्रमुख हरीहर सोळंके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण जोशी यांनी केले. शंकर उद्रकर यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, श्याम वाकदकर, कमलाकर खेडेकर, गजानन कुळकर्णी, कमलकिशोर लांडगे, किरण पिंपरकर, सारंग खानझोडे, माधव कुळकर्णी, कांबळे साहेब, मंदार सराफ, महेश लोणकर, श्रीकांत नसवाले, शशांक जोशी, जतीश मुळे, संजय डांगे, विवेक महाजन, सुधीर कुळकर्णी, अतुल भोकरदनकर, विनय जोशी, संजय बोरेकर, विष्णू इंगळे, राम जोशी, अनिल इंगळे, प्रशांत जोशी, प्रद्युम्न कुळकर्णी आदी कार्यकर्ते व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129