चिखली भाजपा तर्फे रविवारी ज्येष्ठ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्ष व तत्पूर्वी भारतीय जनसंघाच्या काळापासून पक्षाचे कार्य करणारे अनेक वयोवृद्ध कार्यकर्ते चिखली शहरामध्ये आहेत. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मिळावा आणि संवादाचा कार्यक्रम रविवार दि. २५ जून रोजी सकाळी १० : ३० वाजता परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आ. श्वेताताई महाले ह्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधतील तरी याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यापूर्वी कार्यरत असलेल्या भारतीय जनसंघाची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत. येथे आणीबाणीच्या काळामध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने भारतीय जनसंघाच्या अनेक कार्यकर्त्यांना मिसा कायद्याखाली तुरुंगात टाकले होते. यापैकी काही कार्यकर्ते आज हयात आहेत. याशिवाय १९८० पासून भारतीय जनसंघाच्या नावाने कार्य करणारे देखील अनेक कार्यकर्ते शहरामध्ये आहेत. या सर्व जुन्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याच्या उद्देशाने रविवार दि. २५ जून रोजी सकाळी १० : ३० वाजता स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आ. श्वेताताई महाले ह्या स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील व त्यांचे मनोगत जाणून घेतील. तरी मोठ्या संख्येने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button