♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

MH 28 News Live / डोणगाव : समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा १ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. चॅनेल क्रमांक २७३ जवळ अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

या अपघातात हरियाणातील बिच्चार भवन, रामनगर येथील हनीफ जहाण (वय ३७) या कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर कंटेनरचा पुढील भाग चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे काही वेळातच ती पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129