♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगावमध्ये शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

MH 28 News Live / खामगाव : शासनाची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक ( fraud  ) केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी माधव मोतीराम पांढरे पाटील याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी अटाळी येथील मोहन फाळके यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, पांढरे याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतील सबसिडी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील रक्कम माऊली इरिगेशन व भारत इरिगेशन या खासगी कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली.

फसवणुकीच्या या व्यवहारामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून कोठडीत ठेवले होते. पुढील सुनावणीत न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129