♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अबब…! गालिचेच गालिचे… संकटग्रस्त ट्रकचालकाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आमखेडच्या संधीसाधूंनी लांबवले ४५ लाखांचे गालीचे. ४२ लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी केले ३ चोरटे गजाआड

MH 28 News Live, चिखली : उत्तर प्रदेशातून मुंबईकडे विक्री करण्याकरता ५२ लाखाचे गालिचे घेऊन जाणारा ट्रक १९ मार्चच्या रात्री चिखली मेहकर मार्गावर अपघात ग्रस्त झाला. ही संधी साधून लगतच्या जामखेड गावातील चोरट्यांनी रात्रीतून तब्बल ४५ लाख रुपये किमतीचे गालिचे पाळवले. परंतु, चिखली पोलिसांनी तडकाफडकी तपास तपासाला वेग देऊन ४२ लाखाच्या गालीच्यांसह ३ आरोपींना गजाआड केले असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी आहे की, दि. १९ मार्च २०२२ रोजी उत्तर प्रदेश मधील मिराजपुर येथून अमोल ट्रांन्सपोर्ट मधून स्वतः च्या मालकीच्या एम. एच. ४८ बी. एम. ४४५० आयशर या ट्रक मधून मधून चालक मनोज अशोक रुपेकर ( ३५ ) मुकुंदवाडी, औरंगाबाद हे आपल्या आयशर ट्रक मधून वेगवेगळ्या आकाराचे
किंमत ५२ लाख रुपये ११६३ महागडे गालीचे घेऊन मुंबईकडे जात असतांना चिखली – मेहकर रोडवरील चिखली पोलीस स्टेशन हददीतील आमखेड फाटयाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक रात्री १० च्या सुमारास रोडच्या खाली कलांडला. ट्रक चालक मनोज रूपेकर यांनी गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते न जमल्याने रुपेकर हे गाडीतच झोपले. सकाळी ५ वाजता त्यांनी उठुन पाहीले असता त्यांना त्यांच्या आयशर ट्रकमध्ये भरुन आणलेले अंदाजे ४५ लाख रुपयांचे गालीच्यांवर अज्ञात चोरटयांनी रात्री १० ते सकाळी ५ च्या दरम्यान हात साफ केल्याचे त्यांच्या लक्षात आले. रुपेकर यांनी त्यांच्या मेहकर येथील नातेवाइकांना घटनास्थळी बोलावून घेऊन सदर घटनेची माहीती सांगीतली. त्यानंतर चिखली पोलीस स्टेशनला कळवले असता चिखली पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

चालक मनोज रूपेकर यांनी आपल्या आयशर ट्रकमधील गालीचे चोरणारे गणेश भास्कर भाकडे, भागवत शेषराव भाकडे, सुनील जयदेव वाघ, अंकुश रामदास वाघ, पवन विठ्ठल भाकडे, गणेश प्रकाश भाकडे सर्व रा. आमखेड ता. चिखली व इतर लोकांनी रात्रीच्या दरम्यान चोरुन नेले आहे असा तोंडी रिपोर्ट दिल्यावरुन पोलीसांनी अपराध क्र २७१/२०२२ कलम ३७९,३४ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास हाती घेतला.

आमखेड फाट्यावरील सदरची घटना घडल्याची माहीती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. ठाणेदार अशोक लांडे, सपोनि अमोल बारापत्रे, पोलीस अंमलदार पोहेकॉ शरद गीरी, पोहेकॉ प्रकाश बाजड, गुलाबराव काळे, नापोकॉ. विजय कीटे, नापोकॉ सदानंद चापले, पोकॉ निलेश साळवे, सुनिल राजपुत, बळी भांडेकर, प्रशांत जायभाये, सुरज राजपुत, राहुल पायघन, शिवा तांबेकर, उमेश राजपुत, विनोद शिराळे यांनी घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हयाचे तपासात गणेश भास्कर भाकडे, भागवत शेषराव भाकडे, सुनिल जयदेव वाघ, सर्व रा.आमखेड ता.चिखली यांचा शोध घेवुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेले ४५ लाख रुपये किंमतीचे गालीच्यांपैकी ४२ लाख रुपयाचे गालीचे जप्त करण्यात आले आहेत, तर उर्वरीत फरार असलेले अंकुश रामदास वाघ, पवन विठठल भाकडे, गणेश प्रकाश भाकडे या आरोपींचा शोध सुरु आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129