♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सुनील वायाळ यांना राज्य शासनाचा ग्रंथ मित्र पुरस्कार जाहीर

 

MH 28 News Live / चिखली : ग्रंथालय चळवळीशी अनेक वर्षांपासून निगडित असलेले स्थानिक जागृती वाचनालयाचे अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य सुनील वायाळ यांना ग्रंथालय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीने ग्रंथ मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सुनील वायाळ हे वाचन संस्कृतीची चळवळ जोपासण्यासाठी आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील असतात, ग्रंथालय भारती या संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात,वाचन संस्कृतीची चळवळ वाढावी यासाठी विविध प्रकारचे उपक्रम देखील वायाळ यांनी राबवले आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून लवकरच तिसरे पुस्तक प्रकाशित होत आहे. दरवर्षी ग्रंथालय भारतीच्या वतीने दीपावली विशेष अंक प्रकाशित करण्यात येतो याचे संपादन ते करतात. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका सुरू करण्यासाठी शासनाकडे अभ्यासपूर्ण अहवाल सुनील वायाळ यांनी सादर केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि एका निवड समितीच्या माध्यमातून गुणांकन करून चांगले गुण मिळाल्याने हा प्रतिष्ठेचा असा ” ग्रंथ मित्र” पुरस्कार जाहीर झाला आहे ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि चिखलीकरांसाठी गौरवाची बाब आहे .

ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सुनील वायाळ यांचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ . राजशेखर बालेकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रवींद्र पांडे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ. गजानन कोटेवार, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक अशोकराव गाडेकर, बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.कमलेश‌ खिल्लारे, विष्णू इंगळे, बुलढाणा जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंतराव सातव, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यानी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129