♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेळघाटातील १०० चिमुकल्यांची दिवाळी झाली गोड ! आदिवासी बालकांच्या आनंदासाठी वाधवाणी परिवाराचा मदतीचा हात

MH 28 News Live / मेळघाट : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि गोडधोडाचा सण! मात्र, मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांच्या चिमुकल्यांसाठी हा आनंद आर्थिक परिस्थितीमुळे मर्यादित राहतो. अशा बालकांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावरही सणाचा आनंद फुलावा, या संवेदनशील भावनेतून सेवा संकल्प संस्थेच्या वतीने दरवर्षी तब्बल ५ हजार बालकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येते. उपक्रमामध्ये वाद वाणी परिवारातर्फे भरीव योगदान देण्यात आले. नगरसेवक तथा उद्योजक दीपक वाधवाणी यांच्या पुढाकारातून आदिवासी मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले.

 

या सेवाभावी उपक्रमासाठी सेवा संकल्प संस्थेचे कार्यकर्ते सहकार्याचे आवाहन घेऊन आले असता, त्यांच्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद देत १०० बालकांसाठी वाधवानी परिवाराच्यावतीने दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला. या छोट्याशा योगदानातून मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी चिमुकल्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आपल्या घरातील दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचला, तरच सणाच्या आनंदाला खरा अर्थ प्राप्त होतो. आपण केलेली मदत किती मोठी आहे, यापेक्षा ती गरजूंच्या चेहऱ्यावर किती आनंद फुलवते, हे अधिक महत्त्वाचे असते. याच भावनेतून या उपक्रमात वाधवानी यांच्यातर्फे वाटा उचलण्यात आला. आमदार श्वेताताई महाले आणि नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. मेळघाटातील प्रत्येक चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलो आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाची पणती तेवत राहो, हीच या उपक्रमामागील मनापासूनची सदिच्छा असल्याचे भावनिक उद्गार याप्रसंगी दीपक वाधवानी यांनी काढले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129