♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची मुदत; उरले फक्त काही तास…

MH 28 News Live : देशातील सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

चार मे रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. काल रविवार असून देखील गुंतवणूकदारांना एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी बाँका सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. शेअर बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी संध्याकाळी सातपर्यंत या आयोपीओला 16,20,78,067 शेअर्ससाठी एकूण त 29,08,27,860 बोली प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे ही गुंतवणूक आता 1.79 पटीने वाढली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असून, या आयपीओची किंमत 21 हजार कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान चार मे रोजी एलआयसीचा आयोपीओ गुंतवणूकीसाठी खुला होताच या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला तो म्हणजे विमाधारक आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा. एलआयसीचे कर्मचारी आणि विमाधारकांना गुंतवणुकीसाठी सूट देण्यात आल्याने या आयपीओला त्यांचा चांगाल प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे.

पात्र संस्थागत गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद

मिळत असलेल्या माहितीनुसार पात्र संस्थागत गुंतवणूकदार श्रेणीमध्ये अद्यापही पूर्ण सब्सक्रिप्शन होऊ शकलेलं नाही. पात्र संस्थागत गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असलेल्या केवळ 0.67 टक्केच समभागांनाच बोली लागली आहे. तर दुसरीकडे गैर संस्थागत गुंतवणूकदार श्रेणीमध्ये आतापर्यंत 2,96,48,427 शेअर्ससाठी एकूण 3,67,73,040 बोली लागली आहे. गैर संस्थागत गुंतवणूकदारांचे सब्सक्रिप्शन हे 1.24 पटीने वाढले आहे. या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद हा विमाधारक तसेच एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.

विमाधारकांना 60 रुपयांचा डिस्काउंट

एलआयसीच्या आयपीओमध्ये प्रति शेअर्ससाठी 902-949 रुपयांचे मुल्य निश्चित करण्यात आले होते. एका खंडामध्ये 14 शेअर्सचा समावेश करण्यात आला होता. म्हणजेच तुम्हाला जर एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमितकमी 14 शेअर्सची खरेदी आवश्यक आहे. यामध्ये जे एलआयसीचे विमाधारक आहेत त्यांना प्रति शेअर्समागे 60 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर जे एलआयसीचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रति शेअर्समागे 45 रुपयांची सूट देण्यात आली आहे. एलआयसीची 3.5 टक्के भागिदारी विकून 21,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे सरकारने लक्ष्य आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129