♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दीडशे घरे नियमाकूल करण्यासाठी त्रस्त गावकऱ्याचे चक्क विहिरीत आंदोलन

MH 28 News Live, डोणगाव : एक दोन नव्हे तर चक्क गरजू वंचित लोकांची १५० अधिकृत घरे असून, ही घरे सद्यस्थितीत नियमाकुल झाली नसल्याने एका त्रस्त ग्रामस्थाने बुलडाणा जिल्ह्यातील जवळा येथील ६० ते ७० फूट खोल विहिरी बेमुदत उपोषण छेडले आहे.

देविदास मोरे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. जोपर्यंत घरे नियमाकुल होत नाही तोपर्यंत विहिरच माझे घर असल्याचे म्हणणे आहे. कायदे चांगले असून उपयोग नसतो तर त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे केवळ योजना चांगल्या असून उपयोग नसतो तर ती राबविण्याची मानसिकता असावी लागते. अन्यथा त्या योजनेचा बोजवारा उडतो. सर्वसामान्य गरीब लोकांना हक्काची घरे देण्याच्या योजनेचा असाच बोजवारा शासकीय अनास्थेमुळे उडाला आहे.

जिल्ह्यातील जवळा येथे देविदास मोरे यांनी चक्क विहिरीत उतरुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गावठाण पासून २०० मीटरच्या आत जवळपास १५० लोकांचे अधिकृत घरे आहेत. त्याची नोंद ग्रामपंचायतला असताना सुद्धा ही घरे आज पर्यंत नियमाकुल झालेले नाहीत. तर मेहकर तालुक्यात ही हीच परिस्थिती असून, यासाठी आपण अनेक वेळा अर्जाद्वारे मागणी केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे जवळा येथील धरणातील विहिरीत बसून अमरण उपोषण करत असल्याचे मोरे यांनी सांगितले. मागणी पूर्णत्वास गेल्यावरच उपोषण मागे घेईल असा पवित्रही त्यांनी घेतला आहे जवळा येथील उपोषणाला मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई व पंडागळे यांनी भेट देऊन उपोषण कर्त्या सोबत चर्चा केली मात्र बातमी लिहीपरियंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129