महाराष्ट्र पोलिसांसाठी खूशखबर ! ३० वर्षे काम करणाऱ्यांची होणार भरती
MH 28 News Live : पोलीस दलात ३० वर्षे सेवा बजावलेल्या आणि सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदावर ३ वर्षे काम केलेल्याना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून, यामुळे मुंबईसह राज्यभरातील हजारो सहाय्यक पोलीस उप निरीक्षक हे आता फौजदार होणार आहेत.
शिपाई बनणार थेट हवालदार
या योजनेनुसार साखळी पदोन्नती मिळण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हा निर्णय २ महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यात शिपाई पदानंतरचे नाईक हे पद रद्द करून शिपायांना थेट हवालदार पदाची संधी देण्यात आली होती. तर सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना उप निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती. त्यामुळे सध्या या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना उप निरीक्षक पदाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने आदेश काढले असून, अंमलदार संवर्गासाठी पदोन्नती च्या संधीत वाढ करण्यासाठी ही उपनिरीक्षक पदाची पदोन्नती सुरू केली आहे.
अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना
दरम्यान, या सहाय्यक पोलीस उप निरीक्षकांना पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण, या पदावरील ३ वर्षे काम पूर्ण तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभानुसार पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या पदाची वेतन श्रेणी घेत असलेले असे ३ निकष पूर्ण करणाऱ्याना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना उप निरीक्षक पदाची पदोन्नती देण्यात येत असल्याच्या सूचना राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी काढल्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button