♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सीतेला पळवून नेण्याचा प्लॅन रामानेच आखला; रावण निर्दोष होता… पंजाबी प्राध्यापिकेने तोडले अकलेचे तारे

MH 28 News Live : देशात धार्मिक कारणावरून भडकावू व आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे तसेच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये सध्या सुरू असलेल्या हनुमान चालीसा च्या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकताच पंजाब मधील एक नवा वाद समोर आला असून हा वाद रामायणातील एका प्रसंगाचा संदर्भात आहे पंजाब मधील एका प्राध्यापिकेने प्रभू रामचंद्र वर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्या प्राध्यापिका ला विद्यापीठातून बडतर्फ करण्यात आले आहे

पंजाबमधील फगवाडा याठिकाणची लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सध्या वादात सापडलीय. येथील एका सहाय्यक महिला प्राध्यापकानं भगवान राम यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलंय. तसंच यासंबंधीचा ऑडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर संतापजनक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

गुरसंग प्रीत कौर असं या प्राध्यापिकेचं नाव आहे. लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सहायक प्राध्यापिकेला विद्यापीठ प्रशासनानं बडतर्फ करावं, अशी मागणीही अनेकांनी लावून धरलीय. यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शनिवारी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्राध्यापिकेला बडतर्फ करण्याचा आदेश जारी केलाय.

गुरुसंग प्रीत कौरनं भगवान राम यांच्याबद्दल अपशब्द वापरत रावण चांगला माणूस होता. पण, रामानं त्याची फसवणूक केल्याचं सांगितलंय. ती इतक्यावर थांबली नाही तर पुढं म्हणाली की, ‘सीतेला पळवून नेण्याची योजना रावणाची नसून रामाची असल्याचं सांगितलंय. असं करून रामाला त्याचा शत्रू रावणाला जाळ्यात अडकवायचं होतं, असं तिनं नमूद केलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळं काही लोक दुखावले गेल्याचं आम्हाला समजतं. ज्यामध्ये आमचा एक फॅकल्टी सदस्य त्याचं वैयक्तिक मत मांडताना ऐकू येत आहे, असं लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीनं याबाबत निवेदन जाहीर करत म्हटलंय. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, त्यांनी केलेली मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि विद्यापीठ त्यापैकी कोणाचंही समर्थन करत नाही,’ असं विद्यापीठानं निवेदनात म्हटलंय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129