
नरहरीनाथ महाराज त्रिशताब्दी महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण तहसीलदार डोंगरजाळ यांच्या हस्ते सहपती महापूजा संपन्न
MH 28 News Live / देऊळगाव राजा : श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे वसंत पंचमी ११ फेब्रुवारी रोजी महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयाच्या प्रथम पदवीदान समारंभ, श्रीसंत नरहरिनाथमहाराज त्रिशताब्दी जयंत्युत्सव, व श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार समारंभाचे अधिकृत बोधचिन्ह (Logo) चे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ , मठाधिपती मोहन महाराज पैठणकर, हभप उदबोध महाराज पैठणकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने या मठातील श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आली. नाथपीठ ३०० असे या बोधचिन्हाचे ब्रीद वाक्य आहे. यामध्ये संस्थानाची तीनशे वर्षांची परंपरा, पांडुरंगाचा गंध, आणि खालील ज्ञानदान, सेवाकार्य या शब्दातून विद्यालयाचे कार्य, पुरस्काराचे कार्य अधोरेखित होते आहे. अशा विशेष अंगाने या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याप्रसंगी श्रीसंत नरहरिनाथ महाराज सेवा समितीचे सदस्य व परिसरातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते. मागील चार वर्षांपासून प्रतिवर्षी आषाढी एकादशीचे दिवशी तहसीलदार यांच्या शुभहस्ते या महापूजेचे आयोजन करण्यात येते.



