
जिल्ह्यातील त्या ३३ पोलिस अधिकार्यांचा झाला अमरावतीत सत्कार
MH 28 News Live, बुलढाणा : अमरावती परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या अमरावती परिक्षेत्रातंर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस विभाग वार्षिक निरीक्षण दौर्याचा पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे आज १० फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात आला.


या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक बाबुराव महामुनी, खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी, खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, बुलडाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, विलास यामावार उपविपोअ. मेहकर/ दे.राजा, स्थागुशा प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक एन. लांडे तसेच सर्व ठणेदार आणि शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी अमरावती विशेष पोलिस निरिक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२२ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात दाखल असलेले ‘गंभीर, संवेदनशील गुन्ह्यांची उकल, गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, आरोपी शोध घेवून उत्कृष्ट कामगीरी बजाविणार्या (Felicitated) अशोक थोरात अपोअ. खामगांव, बी. बी. महामुनी अपोअ. बुलढाणा, अभिनव त्यागी उपविपोअ मलकापूर, अमोल कोळी. उपविपीअ खामगांब, विलास यामावार उपविपोअ मेहकर/दे. राजा, सचिन कदम उपविपोअ बुलढाणा स्थागुशा पोलिस निरीक्षक प्रभारी अशोक लांडे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते पोलिस स्टेशन बोराखेडी, एफ.सी.मिर्झा पो.स्टे.मलकापूर पोनि. सुरेश नाईकनवरे पो.स्टे. खामगांव ग्रा., पोनि शांतीकुमार पाटील पोस्टे. सायबर, पोनि.अनिल गोपाळ पो.स्टे. शेगांव शहर., पोनि श्रीमती निर्मला परदेशी पो.स्टे,मेहकर; सपोनी. राजवंत आठवले पोस्टे. रायपूर, पोनी. गिरीश ताथोड प्र.पो. उप-अधी (मुख्यालय), सपोनि. गणेश. हिवरकर पो.स्टे. अंढेरा, सपोनि. जितेंद्र आडोळे वाचक पो. अ. बुलढाणा, सपोनि.विलासकुमार सानप, अमित वानखडे, मनिष गावंडे, पोउपनि सचिन कानडे, श्रीकांत जिंदमवार स्था. गु. शा. बुलढाणा, पोउपनि अमोल बारापात्रे पो.स्टे. चिखली, सपोनि. सचिन चव्हाण जि.वि.शा. बुलढाणा, सपोनि. श्रीमती प्रियंका गोरे पो.स्टे. बुलढाणा शहर, गोकुलसिंग राठोड, दोषसिध्दी विभाग बुलढाणा, पोउपनि दिनेश शिरेकार सीसीटीएनएस विभाग बुलढाणा, चतरसिंग सोळंके राखीव पो. निरीक्षक, पोनि सादिक अकबर पठाण मोटार परिवहन विभाग बुलढाणा रिजय रिंढे-कार्यालय अधीक्षक पो.अ.कार्यालय बुलढाणा यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवर यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा पोलीस दलाकडून सन २०२२ मध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.



