♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डोणगांव परीसरात ” रात्रीस खेळ चाले…”

MH 28 News Live, डोणगाव : सध्या डोणगांव परीसरात अवैध रेती वाहतूकीचा खेळ राञी चालू असताना याकडे महसूल प्रशासन तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकारी व डोणगाव पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष यामुळे शासनाचा कर बुडत आहे. शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असतांनाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

डोणगांव हे राज्य महामार्गोवर असणारे गाव असून येथून वाशिम अकोला जिल्ह्याच्या सिमा लागलेल्या आहेत पण गत काही दिवसांपासून मेहकर मालेगाव रोडवर विना नंबरचे व एकाच पावतीवर अनेक वेळा रेती वाहतुक करणारे वाहने खुलेआम ओव्हर लोड रेती वाहतूक करताना राज्य महामार्गोवर दिसतात एवढेच नव्हे तर तर सुर्यास्त झाल्यावर रेती वाहतूक करण्याला परवानगी नसताना डोणगांव येथे खुलेआम रात्री रेती वाहतूक परजिल्हयात होत असताना जिल्हा सिमेवर कोणत्याही प्रकारची चेक पोस्ट नाही व सदर वाहने ही पोलीस स्टेशन समोरुन जात असताना याची साधी चौकशीही केली जात नाही. रेती वाहतूक करणारी अनेक वाहने पावती परजिल्हयात विक्रीची घेतात व वेळही 24 तासाची घेऊन प्रत्यक्ष डोणगांव परिसरातच रेती आणून विक्री करून शासनाचा लाखो रुपयाचा कर बुडवत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक वाहनांवर मागून नंबर प्लेट देखील नाही. क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूक करीत असताना परीवहन अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर वाहतुक करणार्‍या वाहनांना सुट तर दिली गेली नाही ना ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. तरी डोणगांव परीसरात होणारी क्षमतेपेक्षा जादा रेती वाहतूक व बुडत असणारा शासनाचा लाखो रुपयांचा कर यासाठी महसुल प्रशासनाने भरारी पथक नेमून सदर वाहनांवर कारवाई करावी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनीही सदर वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129