बुलडाणा, चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यातील या पाच गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर
MH 28 News Live, बुलडाणा : दे.राजा तालुक्यातील धोत्रा नंदई, चिखली तालुक्यातील धोडप व पळसखेड सपकाळ, बुलडाणा तालुक्यातील देव्हारी, मोताळा तालुक्यातील पोखरी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.
धोत्रा नंदई येथील लोकसंख्या 2557 असून येथे दररोज 5 लक्ष 3 हजार 150 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. धोडप येथील लोकसंख्या 2300 आहे. येथे दररोज 50 हजार लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच पळसखेड सपकाळ येथील लोकसंख्या 450 असून येथे दररोज 10 हजार 750 लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे. देव्हारी येथील लोकसंख्या 690 आहे. येथे दररोज 35 हजार 580 लीटर पाणी पुरविण्यात येईल. तर पोखरी येथील 750 लोकसंख्येकरीता 24 हजार 720 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर, बुलडाणा व सिं. राजा यांनी कळविले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button