दि चिखली अर्बन विद्यानिकेतन मध्ये कौशल्य उन्हाळी शिबीर संपन्न
MH 28 News Live, चिखली : दि चिखली अर्बन सी.बी.एस.ई स्कूल मध्ये दि. १६ मे रोजी कौशल्य उन्हाळी शिबीर समारोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार अशोक लांडे होते तर अध्यक्ष म्हणून चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था तसेच चिखली अर्बन को. ऑप. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे लाभले होते. तसेच शाळेच्या पालक संचालिका जोत्स्ना गुप्ता, शैक्षणिक संचालिका डाँ. पूजा गुप्ता महाराष्ट्र कॉन्सिल्स ऑफ इंडिअन मेडिसिन अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे या कार्यप्रसंगी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुरुषोत्तम दिवटे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. या प्रसंगी मुलांचे तीन गट करण्यात आले होते प्रत्येक गटाने कराटे, लाठीकाठी, योगा, डान्स, स्वीमिंग, गरबा इत्यादी प्रात्यक्षिक सादर केले.
दि. १ मे ते १६ मे या कालावधीत घेण्यात आलेल्या या निवासी व अनिवासी उन्हाळी शिबिरामध्ये विध्यार्थ्यांना योगा, प्राणायाम, नृत्य ( हिपहॉप क्लासिकल, ब्रेक डान्स), चित्रकला, गरबा, लाठीकाठी, कराटे, रांगोळी, आर्ट & क्राफ्ट, जलतरण (स्विमिंग) चे धडे देण्यात आले. सहभागी शिबिरार्थ्यानी या सर्व उपक्रमाचा आनंद लुटून नवीन कौशल्य आत्मसात केले. या बरोबरच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व कायदे या विषयावर मार्गदर्शनासाठी पोलीस स्टेशन ला भेट या शिबिरादरम्यान देण्यात आली. यावेळी पोलीस बांधवांशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. तसेच प्रथमोपचार , महत्वाची भारतीय पिके, सर्पजगत, व्यक्तीमहत्व विकास, प्रेरणादायी भाषणे, स्पोकन इंग्लिश इत्यादी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्याना बँकिंग संदर्भात माहिती मिळावी यासाठी बँकेला भेटही देण्यात आली. वन्य जीवांचे संरक्षण ही आपली मुलभूत जबाबदारी असल्याची जाणीव व्हावी यासाठी विद्यार्थ्यांची बोथा अभियारण्यात क्षेत्र भेटही शिबिरादरम्यान आयोजित करण्यात आली होती. सर्व शिबिरार्थीनी विविध उपक्रमाचा आनंद घेतला.
चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांनी या शिबिराच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि “आतापर्यंत कोणी विचारले नाही असे प्रश्न मुलांनी मला विचारले. वाहतुकीचे नियम समजून घेतले. मुले खरोखर मोबाईल पासून दूर राहू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले तसेच मुलांना गरज असेल तरच मोबाईल द्यावा असे आवाहन त्यांनी पालकांना दिले.”
डॉ. आशुतोष गुप्ता यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि, “विद्यार्थी जीवनामध्ये फक्त डिग्रीला महत्व नाही तर कौशल्य हे खूप महत्वाचे असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना घर सोडून राहण्याची सवय लागली तसेच पोलीस यंत्रणा हि सदैव कार्यरत असते या यंत्रणेची सर्वाना विनाकारण भीती वाटत असते ती भीती मुलांच्या मनातून दूर करण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. मुलांना भविष्य घडवण्याची संधी मिळाली. एक सुजान नागरिक म्हणून मुले तयार झाली. पुढील वर्षी अधिकाधिक खेळाचा समावेश या शिबिरामध्ये करण्यात येईल ते असे म्हणाले”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक बावस्कर सर यांनी केले व आभार प्रदर्शन पोर्णिमा गरुड यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button