भींतीवर घड्याळ कोणत्या दिशेला असावे, वास्तूशास्त्र काय सांगते माहीत आहे का ?
MH 28 News Live : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी आणि लावण्यासाठी काही नियम आणि त्याचे काही फायदे आहेत. काही गोष्टी लक्षात ठेवून घरामध्ये कोणत्याही वस्तूचा वापर केल्यास त्याचे शुभ आणि फलदायी लाभ होतात तसेच घरात सकारात्मकता नांदते. त्याचप्रमाणे घराच्या भिंतींवर घड्याळे लावण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत.
अधिक वाचा : माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत, वाचा सविस्तर
चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा आणते.
दरम्यान, आपल्या सर्वांच्या घरी घड्याळे असतात. घरांमध्ये आपण अनेकदा घड्याळ अशा ठिकाणी लावतो अथवा ठेवतो जिथून आपण ते सहज पाहू शकतो. पण हे करत असताना आपण घड्याळाच्या काट्याकडे थोडेही लक्ष देत नाही. खर तर वास्तुशास्त्रानुसार घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी घड्याळ योग्य दिशेने असणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ केवळ आरोग्यच खराब करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आणते. घरातील लोकांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.
घराच्या भिंतीवरील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देते. वास्तू नियमांनुसार घड्याळाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास तेही नुकसानीचे कारण बनते. घड्याळाचा जीवनावर परिणाम होतो. घरातील बंद पडलेले घड्याळ नकारात्मकता पसरवते. त्याचबरोबर घरही घड्याळासारखे निर्जीव अर्थात बंद पडल्यासारखे होते.
त्यामुळे आज आपण घराच्या भिंतींवर घड्याळ लावण्याच्या वास्तुशास्त्राच्या नियमांबद्दल भाष्य करणाप आहोत. इथे आपण पाहणार आहोत की घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला आणि कसे ठेवावे जेणेकरून घरात सकारात्मकता राहते आणि सुख, शांती आणि समृद्धी येते.
अधिक वाचा : जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या बायकोवर बलात्कार
भीतींवर या दिशेला लावा घड्याळ
– घरात सुख-समृद्धी हवी असेल तर पूर्व दिशेला घड्याळ लावा. या दिशेला लावलेले घड्याळ खूप शुभ मानले जाते. वास्तुनुसार घरामध्ये दक्षिण दिशेला घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
– घरामध्ये घड्याळ दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका. या दिशेला असलेले घड्याळ आरोग्यावर परिणाम करते तसेच पैशाची कमतरता देखील आणते.
– वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ लावू नये. या ठिकाणी ठेवलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा घेऊन येते, त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या सुखावर वाईट नजर लागते.
– घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी पेंडुलम सारखी घड्याळे वापरू नका. यासोबतच तुमच्या घरातील घड्याळ बंद पडलेल्या अवस्थेत तर नाही ना याची खात्री बाळगा. याशिवाय घड्याळावर धूळ साचू देऊ नका.
या गोष्टींची काळजी घ्या
– घरात बंद घड्याळ ठेवू नका. वास्तूनुसार जेव्हा घड्याळ थांबते तेव्हा तुम्ही मागे राहतात आणि वेळ पुढे सरकते.
– घरात हिरव्या आणि केशरी रंगाचे घड्याळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.
– बेडरूममध्ये चौकोनी आकाराचे घड्याळ ठेवा. यामुळे घरातील लोकांमध्ये शांती आणि प्रेम राहते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button