♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा;शेतकर्याचे कृषी केंद्रावर हेलपाटे. बफर स्टॉक म्हणुन ठेवलेल्या डीएपी खत विक्रीस परवानगी द्या – विनायक सरनाईक

MH 28 News Live, चिखली : जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीचे कामे आटपुन पावसाच्या प्रतिक्षेत आहे.तर रासायनिक खतासाठी कृषी केंद्रावर हेलपाटे मारत आहे.परंतु मागणी नुसार खत मिळत नाही.मिळाले तर जादा पैसे द्यावे लागत असल्याने व डीएपी खतांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने बफर स्टॉक मधील खत विक्रीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी कृषी विभागाकडे केली आहे.तर खत उपलब्ध न झाल्यास कृषी विभागासमोर शेतकर्यासह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पुर्वमशागतीचे कामेही पूर्ण झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. पिकांची जोमात वाढ होण्यासाठी शेतकरी डीएपी खताला पसंती देतात परंतु याच खताचा तुटवडा भासू लागला आहे. हे काय यंदाचीच समस्या नाही. कोणताही हंगाम सुरु झाला की ज्या खतांची मागणी अधिक असते त्याच खताचा तुटवडा हे ठरलेले आहे. सध्या शेतकरी डीएपी याच खतासाठी कृषी केंद्रावर हेलपाटे मारत आहे.परंतु खत मिळत नसल्याचे परीस्थीती आहे.त्यातच जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रावर बफर(ऐमरजन्सी)
स्टॉक म्हणुन जिल्ह्यात४हजार १६८मेट्रीक टन डीएपी खत पडुन आहे.तर चिखली तालुक्यात सुध्दा अंदाजे६००बॅग बॅफर स्टॉक कोठा कृषी विक्रेत्याकडे पडुन आहे.परंतु तो परवानगी नसल्याने देता येत नसल्याने शेतकरी तर अडचणीत आलेच आहेत.परंतु ते कृषी विक्रेते सुद्धा परवानगी नसल्याने शेतकर्याना उत्तरे देऊन थकल्याने अडचणीत सापडले असल्याचे चित्र आहे.कारण डीएपी खत दिसत असुनही मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने व अनेक दिवसा पासुन डी ए पी खत पडुन असलेले खत विक्री केले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना ऐक्शन मोडवर आली असुन बफर कोठा पेरणी झाल्यावर वितरीत करणार का?असा सवाल उपस्थीत करीत डीएपीचा बफर स्टॉक कोठा विक्रीची कृषी विक्रेत्यांना परवानगी देण्यात यावी, शेतकऱ्यांना मागणी नुसार मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करुण देण्यात यावे, कृषी विक्रीत्याकडे विक्रिस आलेले रासायनीक खत कृषी कर्मचारी समक्ष विक्री करण्यात यावे, खत विक्री व स्टॉकची माहिती फलकावर प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी कृषी विभागाकडे केली आहे.तर बॅफर स्टॉक असलेल्या खत विक्रीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे केली असुन कृषी विक्रेत्याकडे पडुन असलेल्या खत विक्रीस परवानगी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129