स्कूल बसेसची होणार फेर तपासणी; बस चालकांनी बसची तपासणी करून घ्यावी. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये स्कुल बस नियमावली २०११ अन्वये शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसेसची फेरतपासणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत करण्यात येणार आहे.
स्कूल बस चालक व मालकांनी शालेय स्तरावरील स्कुलबस सुरक्षितता समितीशी संपर्क करावा किंवा आपली स्कुलबस उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा येथे दि. 21 ते 30 जून या कालावधीमध्ये सादर करुन स्कुलबसची फेरतपासणी करून घ्यावी. तदनंतरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करावी. तसेच दि. 1 जुलै नंतर फेरतपासणी न करणाऱ्या स्कुलबसेस विरुध्द मोटार वाहन कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button