जनाधार मिळालेले सत्तारूढ झाल्याचा आनंद आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, मुंबई : महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेमधून निवडले गेलेले भाजपा शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. युतीचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि ना. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. बहुमत सिध्द करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्या बोलत होत्या.
2019 ची निवडणूक ही भाजपा शिवसेना युतीने सोबतीने लढविली होती. जनतेने युतीच्या पारड्यात बहुमत ही टाकले . परंतु शिवसेनेने जनतेच्या मताचा अनादर करुन काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक आघाडी करुन भाजपला धोका देऊन महा आघाडी सरकार स्थापन केले . अडीच वर्षांनंतर का होईना या अनैसर्गिक आघाडीबाबत शिवसेनेच्याच आमदारांना याची जाणीव झाल्याने त्यांनी आघाडी सरकार सोडून देउन भाजपासोबत युती करुन सत्ता स्थापन केली. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या मेहनतीचे चीज झाले आहे.
अडीच वर्षांनंतर का होईना युतीचे सरकार स्थापन झाल्याने राज्यातील जनतेला आनंद झाला असून आता पुन्हा राज्यात नव्याने विकासाचे पर्व सुरु होणार आहे.
यानिमित्ताने सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात आ. श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आ. श्वेताताई महाले यांनी तर त्यांचा हा फोटो दिवसभर स्टेटस् म्हणून ठेवलेला आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना , रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, रीपाई आठवले गट या युतीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी व जीवाचे रान करुन युतीचे उमेदवार निवडून आणले आहे. जनतेनी सुद्धा युतीलाच आपला कौल दिला होता. परंतू ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कायम विरोधात काम केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणे युतीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला रूचलेले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या कडवट विचाराने प्रेरित झालेल्या शिव सैनिकांना गत सत्तारूढ झालेले आघाडी सरकार पचनी पडेलेलेच नव्हते. युतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा यामुळे भ्रमनिरास झालेला आहे. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर सत्तेत सहभागी आमदार आणि मंत्री यांची सुद्धा घुसमट होत होती . काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ही शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याने मतदार संघातील कामे मोठया प्रमाणात रखडली . त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण सुरु झाला होता. त्यामूळे शिवसेनेचे सर्व आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्या अस्वस्थतेचा परिणाम सत्तेतून बाहेर पडण्या मार्ग स्वीकारावा लागला.
युतीचे सरकार स्थापन झाल्याने दुरावा दूर होईल
आघाडी सरकार असताना युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्ते यांनी केले. ही दरी सतत कशी वाढत जाईल याची सुद्धा दक्षता युतीच्या विरोधात असणाऱ्या पक्षांनी घेतली . भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आणि शिव सैनिक कधीही जवळ येवू नये यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावली. परंतु, आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्व नसानसात असणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिष्य म्हणून नावलौकिक मिळविलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिव सैनिक यांच्यातील दुरावा दूर होईल. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकीत सकारात्मक परिणाम होऊन हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकत राहील यात शंका नाही.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button