
देऊळगाव राजा पालिकेच्या साधारण सभेवर विरोधी पक्षाचा बहिष्कार; पालिकेसमोर नगरसेवकांचा ठिय्या, सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध संताप
MH 28 News Live / देऊळगाव राजा : विरोधी पक्षाच्या सूचना व मागण्यांकडे स्पेशल दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करीत नगरपालिकेतील विरोधी पक्ष नगरसेवकांनी नगरपालिका कार्यालयासमोर आज (ता. २३)ठिय्या आंदोलन केले. दरम्यान पालिकेत बोलवण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर ही विरोधकांनी बहिष्कार टाकला.
नगराध्यक्ष माधुरी तुषार शिपणे यांनी आज गुरुवार रोजी शहरातील विविध समस्या व प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व महत्त्वपूर्ण अशा ३३ विषयांवर चर्चा करून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा बोलावली होती. दरम्यान विरोधकांच्या प्रभागातील तक्रारी व नागरिकांच्या विविध समस्यांकडे सत्ताधारी व नगरपालिका प्रशासन लक्ष करीत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षातील नगरसेवकांनी वाक आउट केले. व नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत बालिका प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला.
नगरपालिकेच्या भव्य दिव्य इमारतीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती यांचे दालन असून विरोधी पक्षनेता व विरोधी पक्षासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून न दिल्याचा विरोधक यांनी निषेध नोंदविला. सर्वसाधारण सभेत विरोधकांना नियमानुसार विषय पत्रिका दिल्या जात नसल्याचाही आरोप विरोधी नगरसेवकांनी केला.या निदर्शनामध्ये शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजनाताई रामाने, नगरसेवक कोटकर काशीफ खान,नगरसेविका दिशा खांडेभराड, नगरसेवक शिवाजी मेहत्रे,अन्वर शेख,शितल खराट,विद्या कासारे, यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.



