♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पिंपळगाव देवी येथिल प्रा. आ.केंद्र राम भरोसे. रुग्णांची मात्र हेळसांड. गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

MH 28 News Live, धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी हे गाव जळगाव खांन्देश व विदर्भातील शेवटच टोक आहे. या परिसरातील अनेक खेड्यांची भिस्त या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. मात्र इथे डॉक्टर उपस्थित राहात नसल्याने हे केंद्र ‘ राम भरोसे ‘ ठरले असून परिणामी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा भार व रुग्ण उपचार सेवा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून चालवले जाते. या करीता आरोग्य विभागाकडून तज्ञ डॉक्टरांची रुग्ण सेवेसाठी नियुक्ती केल्या जाते. परंंतु रुग्ण सेवेसाठी नियुक्त डॉक्टर आपल्या कर्त्यव्याप्रति निष्क्रिय असून कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. शिवाय ते सतत गैरहजर रहात असल्याच्या तक्रारी गावक-यांकडुन येत आहेत.

दि. ३० जुनचे दुपारी ३ वाजेदरम्यान पिंपळगाव देवी येथिल सुलोचना एकनाथ वाघ या माहीलेचे पोट दुखत असल्याने तिला गावातील प्रा. आ. केंद्रात प्रथमोपचारार्थ दवाखान्यात केले. त्या ठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. या बाबत चौकशी केली असता सतत गैरहजर अपडाउन, सारखे प्रकार समोर आले. तीन ते साडेतीन तास जिवाच्या आकांताने तडफडणा-या महीला रुग्णास अखेर मलकापूर येथिल खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. या प्रकारानंतर साडेसहा वाजेदरम्यान डॉक्टरची हजेरी झाल्याने उपस्थित संतप्त नागरिकांनी डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च आरोग्य सेवार्थ होत आहे. मात्र असे निष्क्रिय डॉक्टर गलेलठ्ठ पगार घेत कामचुकारपणा करत असल्याची तक्रार पिंपळगाव देवी येथिल ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे केली आहे. आपल्या कर्त्यव्य सेवा वेळी गैरहजर राहुन कसुर असणाऱ्या दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर सात दिवसाचे आत कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आगामी सात दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे दालनात उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर गावातील अमोल पुरी, योगेश वाघ, अशोक वाघ, सचिन वाघ, विजय वाघ , संजय आढाव, आकाश शिंगोटे, योगेश साबळे, मोहन वाघ, सदानंद सोनवणे, भागवत वाघ, श्रावण पाटील सह अनेक नागरीकांच्या सह्या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129