
औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती. २५ आँगस्टला होणार निवड प्रक्रिया
MH 28 News Live, बुलडाणा : औरंगाबाद मनपा स्मार्ट सिटी योजनेत माजी सैनिकांसाठी पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी २० माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर कम कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेणार आहे. ही निवड प्रक्रिया दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबविली जाणार आहे.
पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी सदर वेळेस डिस्चार्ज बुकची कॉपी, आर्मी व सिविल हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स, आर्मी गुंजूएशन सटीफीकेट या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, लागणार आहे. तसेच पात्रता ट्रेड : सैन्य दलातील ट्रेड DSV(Spl Veh)/AM-50/Dvr/Dvr (MT)/DMT/Dvr, Gnr/Dvr(AFT) यापैकी असावा. शैक्षणिक अर्हता दहावी किंवा बारावी पास आणि आर्मी ग्रॅज्युएट, वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSV BUS (TRV- PSV-Bus) धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे.
निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडी, नियुक्तीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत तयार करावा लागेल. सैन्य दलात हेवी व्हेईकल ड्रायव्हिंगचा किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मेडीकल कॅटेगिरी SHAPE-1 तसेच वयोमर्यादा अधिकतम ४८ वर्षे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, 41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दूरध्वनी : ०२४०-२३७०३१३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button