अखेर बुलढाणा भूमराळा बसफेरीचा विस्तार वझर आघाव पर्यंत. सरपंचांची मागणी मान्य
MH 28 News Live : लोणार तालुक्यातील वझर आघाव हे तालुक्याचे शेवटचे अतिदुर्गम गाव असून भूमराळा येथून वझर आघाव येथे जाण्यासाठी सरपंचांनी संबंधित विभागाकडे लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी करत पाठपुरावा केला व हा तीन किलोमीटरचा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा तयार करून घेतला. या रस्त्यामुळे ग्रामस्थांना सुविधा निर्माण झाली आहे.
बीबी, दुसरबीड, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी जाण्याकरता सोयीस्कर असा रस्ता होता मात्र जिल्ह्या मुख्यालयातून थेट वझर आघाव पर्यंत एसटी महामंडळाची बस नव्हती. त्यामुळे जिल्हा मुख्यालय ठिकाणी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर शैक्षणिक खाजगी व आरोग्य बाबतीत हॉस्पिटलला जाणाऱ्या लोकांची गैरसोय होत असे.
या गंभीर मागणीची दखल घेत सरपंच रामेश्वर आघाव यांनी जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा भुमराळा बस सेवेचा विस्तार वझर आघाव पर्यंत करण्याकरता संबंधित विभागाला निवेदन देऊन या बस सेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मागणीची दखल घेत अखेर बुलडाणा भुमराळा बस सेवेचा विस्तार वझर आघाव पर्यंत करण्यात आला आहे. सदर बसफेरीचा शुभारंभ दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी झाला असून सदर बस वझरआघाव येथे येताच फटाक्याची आतिषबाजी करत सदर बसचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर चालक वाहकाचा शाल श्रीफळ देत यशस्वी सत्कार करण्यात आला. बुलडाणा येथून आलेले पहिले प्रवासी सर्जेराव बुधवत यांचा सुद्धा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच रामेश्वर आघाव, पोलीस पाटील संजय सरकटे, सीताराम आघाव, दिलीप आघाव, लक्ष्मण टेकाळे चौधरी, संतोष आघाव, शेषराव आघाव सह 300 ग्रामस्थ उपस्थित होते. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांसाठी व नोकरी निमित्त ये जा करणारे व आरोग्य विषयी कामासाठी जाणाऱ्या प्रवासाची सोय झाली त्याबद्दल सरपंच रामेश्वर आघाव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button