
दलित अत्याचार विरोधात भीम आर्मीचे चिखली तहसील समोर धरणे व मुंडण आंदोलन
MH 28 News Live, चिखली : तहसील कार्यालयासमोर भीम आर्मी (भारत एकता मिशन) च्या वतीने दि. २९ आँगस्ट रोजी धरणे व मुंडण आंदोलने यशस्वी रित्या पार पडले. मेहकर तालुक्यातील मोळा – मोळी या गावामध्ये बैल पोळयाच्या दिवसी बौध्द मागासवर्गीय वृध्द व्यक्तीने तोरणा खालुन बैल नेला म्हणुन बौध्द वृध्दा सह त्यांच्या कुंटुंबीयांना व महीलांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच चिखली तालुक्यातील धानोरी गावामध्ये शाळेतील जातीवादी शिक्षकांने मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर लौगिंक अत्याचार केला व राजस्थान मध्ये इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षीय अल्पवीयन मुलाने शाळेतील पाण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे सदर शिक्षकाने त्याला जीव जाईपर्यंत मारले या दलित अत्याचारांविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.
असे विविध विषय घेवुन चिखली तहसील समोर भिम आर्मी च्या वतीने धरणे व मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचेे नेतृत्व भीम आर्मी जिल्हाअध्यक्ष सिंध्दात वानखेडे यांन्नी मुंडण करुन केले. सदर प्रकरणातील आरोपींना अँट्रासिटी व बाल लौगिंक अत्याचार गुन्ह्या अंतर्गत गुन्हा नोदवून या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे असे प्रतिपादन जिल्हाअध्यक्ष सिंध्दात वानखेडे यांनी आंदोलन स्थळी आपल्या वक्तव्यामध्ये केले. तसेच या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला. त्यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे कैलास खंडारे, डेमोक्रेटीड पार्टीचे विदर्भ अ. छोटु कांबळे, पँथर रि. पा. जि. अ. युवा आघाडीचे सतीश पैठणे तसेच स्वाभिमानी रि. पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ पैठणे, गायक देवानद वानखेडे इत्यादींनी आजच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
हे आंदोलन करते वेळी संघमित्राताई कस्तुरे (सामाजिक कार्यकर्ते), अशोक लहाने (जि.कोषाध्यक्ष भीम आर्मी), जि. कार्याध्यक्ष जितेंद्र खांडेराव, अक्षय अवसरे, गजानन बांगर , संदीप खिल्लारे, प्रवीण खिल्लारे, विशाल आव्हाड, सागर सहाणे, राहुल गवई ,निबांजी घेवंदे, अमोल भंडारे, पंढरी दशरथ इत्यादींच्या सहया आंदोलन निवेदना वरती असुन सदर आंदोलनाचे निवेदन हे तहसिलदार साहेब चिखली यांना देण्यात आले.