शिकवणी वर्ग लावतो म्हणत गेलेले पिता-पुत्र अद्याप परतलेच नाहीत. लोणार मधील घटना
MH 28 News Live, लोणार : मुलाला शिकवणी वर्ग लावतो असे म्हणत गेलेले पिता – पुत्र अद्याप पर्यंत घरी न पोहोचल्याने लोणार शहरात एकच खळबळ उडाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील युवक संदीप दिलीपराव सरकटे वय ३५ वर्ष हा आपल्या पत्नी व मुलगा आरव संदीप सरकटे वय १० वर्ष हा शहरातील खटकेश्वर नगर येथे मुलाच्या शिक्षणासाठी भाड्याची खोली करून राहत होता दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान आपल्या स्कुटी गाडी क्र. एम एच २१बी एस ७९५५ ने शिकवणी वर्ग लावतो असा म्हणत घराबाहेर पडला. मात्र सायंकाळपर्यंत घरी दोन्ही पिता-पुत्र न परतल्याने युवकाची पत्नी सौ भाग्यश्री संदीप सरकटे रा. तळणी हल्ली मुक्काम खटकेश्वर नगर लोणार हिने याबाबत लोणार पोलीस स्टेशनला पिता-पुत्र बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली त्या तक्रारीवरून लोणार पोलीस स्टेशनला मिसिंग नंबर ५९/२२ नुसार तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का रामकिसन गीते पोका गजानन डोईफोडे करीत असून या दोन्ही पिता – पुत्राबाबत कोणालाही काहीही माहिती असल्यास किंवा आढळल्यास याबाबत तात्काळ लोणार पोलीस स्टेशनला संपर्क करावा किंवा तपासी अधिकारी पोहे काँ. रामकिसन गीते यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९७६३७२११३७ वर कळवावे असे आवाहन लोणार पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button