♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

या धडाकेबाज माजी क्रिकेटपटूच्या विरोधात अटक वॉरंट, नेमकं काय घडलं…?

MH 28 News Live : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट, कथितपणे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न केलेल्या २३.३६ लाख रुपयांच्या रकमेशी संबंधित आहे. रॉबिन उथप्पा सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडचा ​​संचालक त्यावेळचे हे प्रकरण आहे. हे अटक वॉरंट प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. Robin Uthappa Arrest Warrent

कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उथप्पा त्याच्या निवासस्थानी सापडला नाही. हे प्रकरण ईपीएफ निधीबाबतच्या त्याच्या कथित भूमिकेवर केंद्रित आहे. उथप्पा विरोधातील अटक वॉरंट, सुरुवातीला ४ डिसेंबर रोजी अंमलात आणण्यात आले होते, पण तपास सुरू असल्याने त्याचीअंमलबजाणी करण्यात आली नव्हती.

प्रादेशिक पीएफ आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी पूर्व बंगळुरूमधील पुलकेशीनगर पोलिस ठाण्याला उथप्पा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश ४ डिसेंबर रोजी दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पण, पोलिसांनी स्पष्ट केले की, रॉबिन उथप्पा वॉरंटमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर गेल्या वर्षभरापासून राहत नाही आणि तो सध्या तो दुबईत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129