संकटग्रस्त, पिडीत महिलांसाठी हेल्पलाइन; १८१ डायल करा; शासकीय योजनांची मिळणार माहिती
MH 28 News Live / बुलढाणा : संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीने मदत मिळावी, याकरिता १८१ ही स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी संकटसमयी शासनाच्या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास लगेच मदत मिळेल. यासोबतच विविध योजनांची देखील माहिती होणार आहे. यापूर्वी देखील महिलांसाठी ही हेल्पलाइन सुरू होती. मात्र, सदर हेल्पलाइन मुख्यमंत्री हेल्पलाइनमध्ये विलीन असल्याने मुख्यमंत्री हेल्पलाइनकडे संकटग्रस्त, पीडित महिलांचे कॉल्स येत होते. महिलांना संबंधित कॉल्सकरिता आवश्यक माहितीच्या अनुषंगाने प्रशिक्षित कर्मचारी तसेच पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे महिलांना आवश्यक ते साहाय्य तत्काळ उपलब्ध करून देणे शक्य होत नव्हते तसेच महिलांविषयक कॉल्सची आकडेवारी महिला व बालविकास विभागाला उपलब्ध होत नव्हती.
या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिला व बालविकास विभागाने महिलांसाठी १८१ ही स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, वन स्टॉप केंद्र आदी आपत्कालीन सेवा, शासकीय योजना, मानसिक – सामाजिक समुपदेशन, महिलांविषयक कायदे, संपत्तीविषयक कायदे आदींची माहिती मिळणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र हेल्पलाइनसाठी मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. हेल्पलाइनवर कॉल्स धडकताच लगेच कार्यवाही सुरू होते.
२४ तास टोल फ्री हेल्पलाइन
राज्य शासनाने सुरु केलेली १८१ ही हेल्पलाइन २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे संकटसमयी मदत हवी असल्यास कोणत्याही वेळी महिलांना हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्कासाठी मदत, हुंडा प्रतिबंधक, बालविवाह, संरक्षण अधिकारी, चाइल्ड लाइनच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधायवाचा असल्यास या हेल्पलाइनद्वारे आवश्यक ती मदत केली जाणार आहे. संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी १८२ ही स्वतंत्र हेल्पलाइन सुरू झाली आहे. महिलांना मदतीसोबतच विविध योजनांची देखील याद्वारे माहिती मिळेल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button