♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; १७ विधेयके पारित पुढच्या अधिवेशनाची ठरली ही तारीख

MH 28 News Live : राज्यात नव्यानेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचं पहिले अधिवेशन नागपूर (Nagpur) येथे संपन्न झाले. एक आठवडा चाललेल्या या अधिवेशनात वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदांनी कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभा अशा दोन्ही सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली असून २ विधेयके प्रलंबित आहेत. संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे. आमच्या जाहिरनाम्यात कर्जमाफी घोषणा केली होती, ती आम्ही पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणावेळी म्हटले. तर, ७८ नवीन सदस्य यंदा निवडून पहिल्यांदाच सभागृहात पोहचल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७८ सदस्य नवीन निवडून आले आहेत, तर ५ जण विधानपरिषदेवरून विधानसभेत आले आहेत. या सर्वांनी पहिल्याच कामकाजात उत्तम सहभाग नोंदवला, संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून लोकांचे प्रश्न सोडावे, असेही नार्वेकर यांनी म्हटले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकूण ६ बैठका झाल्या, ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले असून सभागृहाची १० मिनिटे वाया गेलेली आहेत. एकूण ७ तास ४४ मिनिटे दररोज सरासरी काम झाल्याची माहितीही विधानसभा अध्यक्षांनी दिली. दरम्यान, पुढील अधिवेशन ३ २०२५ रोजी मार्च रोजी मुंबईत सुरू  होईल, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार असेल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129