साहेब ! पाण्याची वाट पाहतोय; पाणी येईल का येईल तरी कधी…? भावनिक साद घालत युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी भारत बोर्डे व इतर काही शेतकऱ्यांसमवेत खडकपूर्णा प्रकल्प व पाटबंधारे अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणला उघड्यावर
MH 28 News Live : बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा तालुक्यात संत चोखासागर जलाशयाचा जन्म झाला तो शेतकऱ्यांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखवून याच जलाशयाचे काम होत असताना एक ना दोन नव्हे तब्बल आठ गावांची जमीन पाण्याखाली गेली अनेक लोक भूमीहीन झाले आठ गावच्या लोकांचे घरदार पाण्याखाली बुडाली त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा मोबदला जो मिळाला तो खूपच कमी होता तरी पण सुद्धा आपल्या राहिलेल्या जमिनीला चांगले दिवस येतील आपल्याला पाणी मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली खरी परंतु अजूनही हरित क्रांतीचे स्वप्न पाहिजे तसे सत्यात उतरलेले दिसत नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाटाचे कामे झाली २०१० ते २०१२-१३ या सालामध्ये पाटाची काम अतिशय जोमाने सुरू झाली. मात्र कोणाची नजर लागली कुणास ठाऊक पाटाचे सर्व ठिकाणचे काम हे अर्धवट झाले बारा वर्ष निघून गेले एक तप पूर्ण झाले अजूनही कुठल्याच मायनर किंवा कुठल्याच कालव्याला पूर्ण टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजून चाऱ्या पूर्ण नाही पाटाचे काम सुद्धा बऱ्याच ठिकाणी अर्धवट पडलेले आहे शेतकऱ्यांचा मोबदला रखडलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी पाट पूर्ण झाले त्या ठिकाणी तरी शेतकऱ्यांना पाणी पोहोचायला पाहिजे होते पण नाही. वेळेवर तेही पाणी पोहोचवण्यामध्ये खडकपूर्णा प्रशासन अपयशी ठरत आहे.
वर्षातून तीन वेळेस पाणी सोडण्याचे नियोजन असताना आता दुसऱ्यांदा पाणी सोडायची वेळ झाली असली तरी अजून पहिलेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. तुरीला पाणी बसेल या आशेने शेतकरी पाण्याची वाट पाहत होता तूर गेली हरभरा गेला ज्वारीचे पीक उभ्या उभे वाळून गेले. पाण्याची वाट पाहत पाहत अजून पर्यंत पाणी नाही मिसळवाडी शेळगाव आटोळ डोढरा शिवारामध्ये पंधरा दिवस झाले पाणी सुटून अजून पाणी पोहोचले नाही. पाटामध्ये प्रचंड झाड झुडपं दगड अनेक ठिकाणी पाठांची गळती या सर्व गोष्टी उघडपणे पडून आहेत जर संत चोखा सागर जलाशयातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तीन विभाग शासनाने नेमून दिले आहेत. पहिला धरणाची निगा राखून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करणारा विभाग, दुसरा मोटर पंप पाठाची दुरुस्ती अजून या सगळ्यांचा समन्वय ठेवणारा तर तिसर डिपार्टमेंट. असे सर्व असताना शेतकऱ्यांना वेळेवर पाणी पोहोचत नाही वेळेवर यांची पंप जळतात कशी छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी यांना अगोदर का दुरुस्त करता येत नाही शासनाच्या गाड्या बंगले ऑफिस बलाढ्य पगार इतका सगळा लाभ घेणारे हे अधिकारी नेमकं करतात काय खरंच पाट पूर्ण होतील का ? चाऱ्या पूर्ण होतील का पश्चिम महाराष्ट्रात जसं पाटाचं झुळझुळ वाणी पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाहत जाऊन शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवलं तसं आमचं होईल का होईल तर कधी अशी भावनिक साद संतोष भुतेकर यांनी अधिकाऱ्यांकडे घातली आहे. यावरच न थांबता सर्व कामे नीट व्यवस्थित जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा पिच्छा सोडण्याचा इशाराही युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button