♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

इथे रुईच्या ओल्या फांदीने झोडपले जातात पुरुष. भानखेडला साजरी होते अनोखी धुळवड

MH 28 News Live, चिखली : गावखेड्यात, वाड्या-वस्त्यांवर आणि दऱ्याखोऱ्यांत अनेक शतकांपासून वास्तव्य करणारा आदिवासी समाज हा अनेक लहान मोठ्या गटांमध्ये म्हणजेच जातींमध्ये विभागला गेला आहे. यापैकी एक असलेल्या महादेव कोळी या आदिवासी समाजाची आगळीवेगळी धुळवड काल साजरी झाली. या दिवशी महिला आपल्या गावातील पुरुषांना रुईच्या ओल्या फांदीने झोडपून हा उत्सव साजरा करतात.

चिखली तालुक्यातील भानखेड या गावी साजरा होणारा हा धुलिवंदनाचा आगळगाव उत्सव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आदिवासी महादेव कोळी समाजाची महाराष्ट्रात सर्वाधिक वस्ती असलेले चिखली तालुक्यातील भानखेड हे गाव होय. होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा धुलिवंदनाचा सण हा या समाजाचा मुख्य सण असून तो साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले महादेव कोळी बांधव या दिवशी भानखेडमध्ये येतात. गावातील ग्रामदेवतेचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक गाणी व नृत्याचा आनंद लूटला जातो. त्यानंतर सुरू होते आगळीवेगळी धुळवड. परंपरेने पुरुषसत्ताक असलेल्या आपल्या समाजामध्ये या दिवशी मात्र आदिवासी महादेव कोळी समाजातील स्त्री ही पुरुषापेक्षा वरचढ ठरते. धुलीवंदनाच्या निमित्ताने का होईना आपलावरचष्मा गाजवतात. पती असो भाऊ असोत काका असो आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि गावातील पुरुषांना या महिला रुईच्या ओल्या फांदीने अक्षरशः झोडपून काढतात. विशेष म्हणजे या उत्सवाला कुठेही द्वेष अथवा रागाची किनार नसून केवळ आनंद साजरा करण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग केला जातो असे अशी माहिती गावचे सरपंच नितेश देवकर यांनी MH 28 News Live ला दिली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129