♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरावर निर्बंध

MH 28 News Live / शेगाव : गजानन महाराज मंदिर येथे मंदिर परिसरातील पावित्र्य, शांतता आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी संस्थानकडून मोबाईल वापरावर सक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि शांत वातावरणात दर्शन घेता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.

शिस्त, स्वच्छता आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रींच्या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, काही भाविकांकडून मंदिर परिसरात मोबाईलवर बोलणे, फोटो काढणे तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले जात असल्याने दर्शन व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे संस्थानच्या निदर्शनास आले होते. यामुळे परिसरातील आध्यात्मिक वातावरण बाधित होण्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

 

या पार्श्वभूमीवर आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच भाविकांना आपले मोबाईल बंद ठेवावे लागणार आहेत. मंदिर परिसरात कुणीही मोबाईलचा वापर करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीचा मोबाईल तात्काळ संस्थान कार्यालयात जमा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेला मोबाईल परत मिळवण्याच्या प्रक्रियेमुळे भाविकांचा वेळ वाया जाऊ शकतो तसेच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मंदिरातील शांतता, शिस्त आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व भाविकांनी संस्थानच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129