♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चार वर्षीय मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला; लोणार तालुक्यात पसरली घबराट

MH 28 News Live, लोणार ( राहुल सरदार ) : लहान मुले पळवणारी टोळ्या गावोगाव फिरत असल्याच्या चर्चेला पेव फुटत असतांना दि. १७ सप्टेंबर रोजी लोणार तालुक्यातील वेणी गावात चार वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महिलेने वेषांतर करून अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या इसमाशी झटापट करून जोरात आरडाओरड केल्याने हा प्रयत्न फसला. मात्र, या प्रकारामुळे लोणार तालुक्यात खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील वेणी येथील रुखमीना पंढरी गायकवाड ( ३५ ) वर्ष ह्या दुपारी १.३० च्या दरम्यान गावाच्या बाजूला असलेल्या शेतात जात होत्या. मुख्य रस्त्यापासून ४०० ते ५०० मीटर आत शेतात एक पुरुष महिलेच्या वेशात आला. त्याने रुख्मिना गायकवाड यांच्या जवळ असलेल्या चार वर्षाच्या श्रद्धा पंढरी गायकवाड नामक मुलीला त्यांच्या जवळून हिसकावून नेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, त्यांच्या सोबत या रूख्मिना गायकवाड यांनी रणरागिणीसारखी झुंजार लढत देत झटापट करत प्रतिकार केला. सोबतच आरडाओरड करून आजूबाजूला शेतात काम करत असलेल्या शेतकरी पुरुष व महिलांना आवाज दिला. तो आवाज ऐकून आजू बाजूला असलेल्या दोन महिला त्या आवाजाच्या दिशेने येतांना दिसताच तो महिलेच्या वेशात असलेला पुरुष स्वतःच्या अंगावरील साडी सोडत त्या ठिकाणावरून पळून गेला. या घटनेची माहिती घेण्यासाठी गावातील राजकुमार दळवे यांच्या भ्रमनध्वनीवर त्या महिलेशी संपर्क साधला असता घडलेली सर्व हकीकत तिने सांगितली. सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता त्या गावात पोलीस पोहचेपर्यंत मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाली.
तसेच या गावात ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजू शेवाळे व गावकऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसरात पाहणी केली. मात्र ती व्यक्ती मिळून आली नाही.

जिल्ह्यातच एकीकडे जळगाव जामोद तालुक्यात तृतीयपंथीयांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यातच लोणार तालुक्यातील वेणी येथील पळून गेलेला माणूस हा व्यक्ती सुद्धा साडी घालून आल्याची माहिती रुख्मिना गायकवाड यांनी दिली. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने या घटनेचा तपास करत त्या आरोपीला तात्काळ अटक करावी जनतेच्या मनातील भीती व समारंभ दूर करावा अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129